पिंपरी चिंचवड महापालिकेच्या गेटवर तिरडी अंदोलन

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या गेटवर तिरडी अंदोलन
प्रतिनिधी,दि.३० जुन २०२५:- भाजपा महायुतीचे घटक पक्ष असणाऱ्या रिपाई आठवले गटाचे महाराष्ट्र राज्य व्यापारी आघाडीचे उपाध्यक्ष दत्तात्रय गायकवाड यांचे ०१ जुलै २०२५ रोजी तिरडी उठाव आंदोलन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या गेटवर करणार दत्ता गायकवाड पत्रकारांशी बोलताना असं म्हणतात. चिंचवड महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामुळे त्यांच्या भ्रष्ट कारवाईमुळे व जाणून-बुजून द्वेषापोटी केलेल्या कारवाईमुळे धनदांडग्याना मदत करण्याच्या उद्दिष्टाने केलेल्या कारवाईमुळे माझी जगण्याची आशा संपली आहे. कारण माझे रोजी रोटी ज्या धंद्यावरती अवलंबून होती ती टपरी महानगरपालिकेने अतिक्रमण कारवाई घेऊन गेले या आंदोलनामधून चुकीच्या कारवाईतून ओढलेली परिस्थिती माझ्या परिवारांना महानगरपालिकेसारख्या शहरामध्ये हलकीचे दिवस आले आहेत.त्यामुळे खचलेला एक नागरिक त्याची झालेले अवस्था ही आंदोलनाद्वारे महानगरपालिकेला दाखवत आहे की खरंच त्याच्यावरती मरणाची वेळ आलेली आहे आणि पिंपरी चिंचवड मनपा अधिकारी यांना आपल्या कायद्याची जाण नाही कोर्टाची जाण नाही कारण दि.२८ मार्च २०२८ रोजी पासून मी महानगरपालिकेमध्ये प्रत्यक्ष, फोनद्वारे किंवा पत्रव्यवहाराद्वारे महानगरपालिकेकडे न्याय मागत आहे परंतु मला न्याय न भेटता उडवा उडी ची उत्तर दिली गेली माझ्याकडे महानगरपालिकेचे लायसन्स असून हाई कोर्टाची हातगाडी धारकांकडून मिळालेली ऑर्डर हे माझ्याकडे असून मी ती माझ्या टपरीवरती दोन्ही प्रति लावले होत्या तरीसुद्धा ब प्रभाग अतिक्रमण विभागाने कोर्टाचा अवमान केला आहे,असे गायकवाड म्हणाले, ज्या संविधानामुळे आपण आज पदावरती आहोत त्या संविधानाचा त्या कायद्याचा गैरवापर करून सर्वसामान्य नागरिकांवरती अन्याय केल्याचे यातून दिसून येते त्यामुळे आंदोलनाद्वारे सामान्य नागरिक या कारवाई द्वारे अक्षरशः कसा मरून जातो कसा उध्वस्त होतो याची जाणीव करून देणारे आंदोलन आहे. आयुक्त साहेब आपल्याला नक्की या आंदोलनातून जाग येईल अशी मी आशा बाळगतो असे मत गायकवाड यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा एक हाॅकर लायसन्स धारक आपल्याकडे विनवणी करत आहे.अशा अने हाॅकर वाले आहेत.माञ पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या गुंडशाही घाबरुन गप्प मुक गिळुन स्वता मरण पसंद करत आहेत.माञ पालिका प्रशासन अधिकारी यांचा आनंद लुटत आहे.त्यामुळे ज्यांना जमेल त्या हाॅकर धारकांनी अंदोलना सामील होण्याचे अहवान देखील गायकवाड यांनी केले आहे.