E-PaperTop Newsआर्थिक घडामोडीउद्योग विश्वनोकरी विशेषनोकरी विषयकपिंपरी चिंचवडमहाराष्ट्र मराठी बातम्यामाहिती तंत्रज्ञान

आयटी त्रिपक्षीय सल्लागार समिती पुन्हा सक्रिय करण्यासाठी  विधानपरिषद आमदार अमित गोरखे यांच्यासोबत बैठक

आयटी त्रिपक्षीय सल्लागार समिती पुन्हा सक्रिय करण्यासाठी  विधानपरिषद आमदार अमित गोरखे यांच्यासोबत बैठक

पिंपरी चिंचवड :  28 जून – प्रतिनिधी (माझा इंडिया न्यूज) आज महाराष्ट्र विधानपरिषद सदस्य श्री. अमित गोरखे यांची भेट घेण्यात आली. या भेटीत महाराष्ट्र शासनाची आयटी त्रिपक्षीय सल्लागार समिती पुन्हा सक्रिय करण्यासंदर्भात चर्चा झाली. राज्यातील आयटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर देखील मते मांडण्यात आली व लवकरच योग्य त्या निर्णयांसाठी पुढील पावले उचलण्यात येतील, असे आश्वासन आमदार गोरखे सरांनी दिले.

आयटी क्षेत्रातील कामाचे तास, कंत्राटी पद्धती, रोजगार सुरक्षितता तसेच हिंजवडी, खराडी आयटी पार्क मधील पायाभूत सुविधा यासारख्या मुद्द्यांवर देखील या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. लवकरच या समितीच्या माध्यमातून आयटी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी निर्णय होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

यावेळी आयटीयन्सचे प्रतिनिधी श्री. रविकिरण घटकार, श्री. अनिल ओझा, श्री. संदीप चंदनशिवे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button