
पत्रकारांनी आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज युवराज दाखले
सरकारने पत्रकाराना दरमहा आर्थिक सहाय्य करावे शिवशाही व्यापारी संघाची मागणी
पिंपरी चिंचवड 08/06/25, प्रतिनिधी: (माझा इंडिया न्यूज) शहरातील सर्व माध्यम क्षेत्रात काम करणाऱ्या बंधू भगिनी ना आता आपल्या आरोग्यासाठी थोडा वेळ काढणे गरजेचे आहे बातम्या आणि ऑफिस ची डेड लाइन पाळण्याची मोठी कसरत करताना वेळेवर जेवण आणि थोडा आराम करणे गरजेचे आहे शिवाय सकाळी किमान ५किलोमिटर चालणे , योगा,प्राणायाम सूर्यनमस्कार ,सायकलिंग ध्यान करणे आवश्यक आहे
कामाचा ताण न घेता नियोजनबद्ध टाइमटेबल आणि कडक शिस्त पाळण्यासाठी सकारात्मक विचार पद्धती चे आचरण करणे आवश्यक आहे
महानगर पालिका आणि शहरातील मान्यवर रूग्णालयात पत्रकारांना इलाज करण्यासाठी सवलत देण्यात यावी अशी मागणी लवकरच करणार
पत्रकार हीच खरी शहराची वैचारिक श्रीमंती
एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला राजकारणात विविध पदे प्राप्त करून देण्यात पत्रकारांचा मोठा असतो मात्र कार्यकर्ता मोठा झाल्यावर पत्रकारकडे लक्ष देत नाहीत
महानगर पालिका कडून पत्रकारांना ठराविक रक्कम देण्याची गरज आहे सरकार आज लाडकी बहीण योजेनेत करोडो रुपयांचा निधी खर्च करत आहे मात्र पत्रकार बंधू भगिनी साठी काहीच करताना दिसत नाही
अधिस्वीकृती ची जाचक अट रद्द करावी आणि सरसकट सर्व पत्रकार बांधवांना लाडकी बहीण योजने प्रमाणे एखादी योजना कार्यान्वित करुन महिन्याला किमान ५हजार रुपये द्यावेत
युवराज दाखले
शिवशाही व्यापारी संघ (संस्थापक अध्यक्ष)