
छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा:- कृष्णा साबळे
लोणावळा:- 06/06/25 , प्रतिनिधी,(माझा इंडिया न्यूज) छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास लोणावळा या ठिकाणी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कालखंडात शेतकरी, सर्वसामान्य नागरिक,माता भगिनींनच्या संरक्षणाची जबाबदारी घेऊन कायम खुश राहत होत्या.
त्याच पद्धतीने राज्यात काम करण्याचा संकल्प शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या माध्यमातून करण्यात आला.
यावेळी शिवशाही व्यापारी संघटनेचे मावळ लोकसभा अध्यक्ष कृष्णा साबळे, महिला आघाडी अध्यक्षा भारती चांदणे, अमोल गायकवाड. जयेश देसाई. रवी सरोदे. तुषर सावंत. बिपीन मंडलिक. प्रसाद मंडलिक. आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.