
शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या पिंपरी चिंचवड शहर व ग्रामीण युवा उपाध्यक्ष पदी श्री.रोहन पितांबर माने यांची नियुक्ती जाहीर 💐🙏
मुंबई -प्रतिनीधी, शिवशाही व्यापारी संघ या राज्यातील संघटनेचे पिंपरी चिंचवड शहर व ग्रामीण युवा अध्यक्ष *ऋषिकेश भाऊ वाघमारे व शहराध्यक्ष शिवाजी भाऊ खडसे* यांच्या मार्गदर्शनाखाली *श्री रोहन पितांबर माने* यांची नियुक्ती संस्थापक /अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले यांनी मुंबई मध्यवर्ती कार्यालयातून जाहीर केली.
नवनियुक्त पिंपरी चिंचवड शहर व ग्रामीण युवा उपाध्यक्ष *श्री. रोहन पितांबर माने* यांनी सर्वसामान्य जनता, माता भगिनी, दिव्यांग बांधव, व्यापारी वर्ग, तृतीयपंथी भगिनी यांचे प्रश्न शासन दरबारी मांडून तसेच सोडवण्यासाठी सदैव कटिबद्ध राहण्याच्या सूचना दाखले यांनी देऊन पुढील राजकीय व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.