E-PaperTop News

सिंदुर मोहीम यशस्वी करणाऱ्या देशाच्या वीरांना सलाम ..!  🙏✌️💪:- उषाताई कांबळे- उपनेत्या शिवशाही व्यापारी

*सिंदुर मोहीम यशस्वी करणाऱ्या देशाच्या वीरांना सलाम ..!  🙏✌️💪:- उषाताई कांबळे- उपनेत्या शिवशाही व्यापारी संघ

मुंबई -07/05/25 प्रतिनीधी (माझा इंडिया न्यूज)

आज भारतीय सशस्त्र दलांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान व पाकिस्तान-अधिकृत जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवादी छावण्यांवर अचूक कारवाई केली आहे, या यशस्वी कार्यवाहीचे शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले यांच्या नेतृत्वाखाली आम्ही अभिनंदन करित आहोत.

दरम्यान शिवशाही व्यापारी संघ उपनेत्या उषाताई कांबळे म्हणाल्या की,एकूण ९ दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले असून, ही कारवाई अतिशय संयमित आणि धोरणात्मक पद्धतीने पार पडली.

दरम्यान श्री कपालेश्वर देवस्थान ता खंडाळा जिल्हा पुणे या ठिकाणी महादेवाच्या स्वयंभू पिंडाला संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले यांनी जल अभिषेक करून भारतीय सैन्याचे अभिनंदन केले.

तसेच ही ठोस पावले पाहलगाममधील क्रूर दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर उचलण्यात आली आहेत, ज्यामध्ये २५ भारतीय आणि १ नेपाळी बांधव शहीद झाले.

ही कारवाई म्हणजे भारताची ठाम भूमिका आहे की, दहशतवाद सहन केला जाणार नाही आणि जो कोणी निष्पापांच्या हत्येमागे आहे, त्याला योग्य ती शिक्षा दिली जाईल असं शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या वतीने उपनेत्या उषाताई कांबळे म्हणाल्या आहेत.

जय शिवराय..जय हिंद ..!
भारतमाता की जय !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button