
शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या सांगली जिल्हा अध्यक्ष पदी श्री दिलीप सुखदेव गायकवाड यांची नियुक्ती जाहीर
मुंबई – : 03/05/25 ,प्रतिनीधी, (माझा इंडिया न्यूज ) शिवशाही व्यापारी संघ या राज्यातील संघटनेचे प्रदेश सचिव सुरज आण्णा कांबळे व उपनेते उषाताई कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री दिलीप सुखदेव गायकवाड यांची नियुक्ती संस्थापक /अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले यांनी मुंबई मध्यवर्ती कार्यालयातून जाहीर केली.
नवनियुक्त सांगली जिल्हा अध्यक्ष दिलीप गायकवाड यांनी सर्वसामान्य जनता, माता भगिनी, दिव्यांग बांधव, व्यापारी वर्ग, तृतीयपंथी भगिनी यांचे प्रश्न शासन दरबारी मांडून तसेच सोडवण्यासाठी सदैव कटिबद्ध राहण्याच्या सूचना दाखले यांनी देऊन पुढील राजकीय व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.