विधानसभा उपाध्यक्ष नामदार आण्णा बनसोडे यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवणार्या आयुक्त शेखर सिंह यांच्यावर हक्कभंगाची कार्यवाही होणार का?:- लोकसेवक युवराज दाखले
पिंपरी -प्रतिनीधी, पिंपरी चिंचवड शहर व पुणे शहरालगत वाहणाऱ्या मुळा- मुठा, पवना व इंद्रायणी नदी लगत शेकडो झाडाची वृक्षतोड चालु आहे,या संदर्भात वृक्षप्रेमींनी २७-४-२०२५रोजी पिंपळे निलक या ठिकाणी निषेध मोर्चा काढला होता.
या निषेध मोर्चाची दखल विधानसभा उपाध्यक्ष नामदार आण्णा बनसोडे यांनी घेऊन तात्काळ काम थांबवण्याचे आदेश दिले परंतु त्यांच्या आदेशाला आयुक्त शेखर सिंह यांनी केराची टोपली दाखवली आहे ही अत्यंत चुकीची बाब आहे.
आयुक्त शेखर सिंह यांनी काम चालू ठेवल्याने त्यांच्यावर हक्क भंगाची कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या कडे केली आहे.