
चार ते पाच जणांच्या टोळक्याने दगड आणि हत्यारांनी चारचाकी वाहनं फोडली…
माझा इंडिया न्यूज
पिंपरी (दि. १३ मार्च २०२५) :- चिंचवड येथील केएसबी चौकात चार ते पाच जणांच्या टोळक्याने दगड आणि हत्यारांनी रस्त्यावर पार्क केलेल्या कारच्या काचा फोडल्या. ही घटना घडल्यानंतर टोळके पसार झाले.
याप्रकरणी बुधवारी (दि. १२) रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. बुधवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास एक टोळके चौकात दाखल झाले. त्यांनी अचानक रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांना लक्ष्य करत दगड आणि हत्यारांच्या सहाय्याने काचा फोडण्यास सुरुवात केली. अवघ्या काही मिनिटांतच या टोळक्याने १० ते १२ कारच्या काचा फोडून पळ काढला.
या घटनेबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल फडतरे यांनी संगितले की, टोळक्याने अचानक हल्ला करून वाहनांची तोडफोड केली. आरोपी कोण आहेत आणि त्यांच्या हातात कोणती हत्यारे होती, हे शोधण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासले जात आहे. तपास एमआयडीसी भोसरी पोलिस करत आहेत.