
सोशल मीडिया वरील सर्व पोस्ट खऱ्या नसतात.. पहिल्यांदा खात्री करा.. लोकसेवक श्री युवराज दाखले शिवशाही व्यापारी संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष
बहुजन समाजातील तरुणांनो सावधान,
आपण मोठ्या ट्रॅपमध्ये आहोत. आपल्याला यातून बाहेर पडावं लागेल अन्यथा हजारों समाज बांधवांचे नुकसान आपल्या हातून होत राहील.
खूप गांभीर्याने काळजीपूर्वक पावलं टाकायला सुरवात करा.
मुंबई :- प्रतिनीधी (माझा इंडिया न्यूज) 25/12/24 राजकीय नेत्यांच्या राजकीय एजेंड्यासाठी आपला वापर होतोय. सुपारी घेऊन काही जण आपल्यावर प्रयोग करत आहेत.
व्हाट्सअप ग्रुप, इन्स्टा, फेसबुक, ट्विटर सोशल माध्यमात येणाऱ्या सगळ्या पोस्ट खऱ्या नसतात. गेल्या आठ दिवसात दोनदा आपल्याला झुंजवण्याचा सुनियोजित प्रयत्न झाला आहे. काही भाषणाचे क्लिप ज्या Cut करून वायरल केल्या. प्रश्न अस्मितेचा, भावनेचा निर्माण करून आपल्याला संघर्षाच्या वाटेवर उभा केलं जातं.
आपला बळी जातोय, हजारों समाज बांधवांचे आयुष्य खराब होत आहे केवळ आपण ट्रॅप मध्ये असल्यामुळे…
आपल्याला आवाहन करतो कि चिकित्सक व्हा!
आपल्या भोळा भाबड्या गाव कुसातल्या समाजाला आपल्यालाच सतर्क करावं लागेल!
दिशाभूल करणारे व्हिडीओ फोटो आले कि सत्य किती याचा शोध घेईला सुरवात करा. ज्यानं पाठवलं त्याला cut नको तर पुर्ण व्हिडीओ पाठवण्याची मागणी करा!
ज्यानं पाठवलं त्याने दिशाभूल कारणार का पाठवल म्हणून त्याला प्रश्न विचारा, हे तुला कुठून आलं हे विचारा आणि जोपर्यंत सत्यता वाटणार नाही तोपर्यंत त्याला पुढे पाठवू नका.
आमच्या माहितीप्रमाणे काही लोकांनी मागे 250 फेक अकाउंट आणि जवळपास 100 जणांना जंगलात फार्म हाऊसवर नेऊन त्यांना ट्रेनिंग दिली आहे. या 100 जणांना बहुजन समाजाचे नवे नेते कसे संपवायचे, बहुजन समाजाच्या आंदोलनाला कसे संपवायचे, फेक नरेटिव्ह कशा तयार करायचा, बहुजन समाज प्रामुख्याने मातंग समाज भावनिक आहे. त्याच्यात छत्रपत्ती शिवाजी महाराज,क्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे, सा.लो आण्णा भाऊ साठे, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर व इतर महापुरूषांच्या अस्मितेच्या मुद्द्याना घेऊन त्याला सातत्याने रस्त्यावर कसं उतरवायचे, फेक पोस्ट कशा वायरल करायच्या, फेक अकाउंट कसे उघडायचे अशा आशयाची ट्रेनिंग दिल्याचे समजते.
त्यामुळे तुमच्यावर गेल्या काही काळापासून खूप सोशल माध्यमातून अटॅक वाढले आहेत. आपला राजकीय वापर ओळखा. आपण राजकीय खेळ झालो आहोत. मुद्द्यावर झुंज देऊन जेलमध्ये सडायाचं, मरायचं आपण त्यानी मात्र आपल्या संघर्षाच्या बळावर सत्ता लाटायची हे ओळखा!
संयमाने चिकित्सक बुद्धीने सोशल मीडिया हाताळा तरच आपला निभाव लागेल अन्यथा आपण रिमोट वरील राजकीय रॉबट होऊ असं आह्वान दाखले यांनी केलं आहे..!
– लोकसेवक युवराज दाखले.
संस्थापक/ अध्यक्ष
शिवशाही व्यापारी संघ महाराष्ट्र राज्य