Uncategorized

: चिंचवडच्या आरोपीने पोलिसांच्या अंगावर घातली गाडी; पोलीस अधिकारी थोडक्यात बचावले

राजस्थान जयपूर : चिंचवडच्या आरोपीने पोलिसांच्या अंगावर घातली गाडी; पोलीस अधिकारी थोडक्यात बचावले

आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे.

पिंपरी चिंचवड

September 27, 2024 13:28 IST

car police viral video loksattA

पिंपरी- चिंचवड: आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. हा सर्व थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी जयपूर येथील स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी- चिंचवड सायबरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी हे जखमी झाले आहेत. त्यांच्या पायाला मुका मार लागला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड मध्ये पोलीस अटक करतील अशी भीती दाखवून एक कोटी आठ लाख रुपयांची फसवणूक केलेला आरोपी अक्षत गोयलला पकडण्यासाठी सायबर टीम राजस्थान मधील जयपूर येथे रवाना झाली होती. मयांक गोयल हा अटक असून त्याच्या मदतीने अक्षत गोयलचा शोध सायबर पोलीस घेत आहेत. तो राजस्थानमधील जयपूर येथे असल्याची माहिती मयांककडून पोलिसांना मिळाली. सापळा रचून आरोपी अक्षत गोयलला पकडण्यासाठी सायबर पोलीस त्या ठिकाणी पोहोचले. अक्षत हा त्याच्या इतर मित्रांसह काळ्या चारचाकी गाडीत बसला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button