E-PaperTop News

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची आपातकालीन व्यवस्था ही कागदावरच आहे की काय ? :- शिवाजीराव खडसे

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची आपातकालीन व्यवस्था ही कागदावरच आहे की काय ? :- शिवाजीराव खडसे

पिंपरी – 07/06/25 , प्रतिनीधी (माझा इंडिया न्यूज), पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची आपातकालीन व्यवस्था ही कागदावरच आहे का?असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये पडलेला आहे.

थेरगावमध्ये पावसाच्या अतिवेगामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या थेरगाव रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर एक झाड पडलेलं आहे त्याचबरोबर शनि मंदिराच्या लगत असलेल झाड रस्त्यावरती पडले आहे, उद्यान विभाग या झाडांची योग्य अशी निगा राखत नसल्याचे दिसून येत आहे.

तरी महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह साहेबांनी उद्यान विभागावरती त्याचबरोबर आपातकालीन परिस्थिती सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यावरती तात्काळ त्यांना कारणे दाखवा नोटीस देणे गरजेचे आहे, अन्यथा शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांच्या नेतृत्वाखाली अंदोलन करण्यात येईल.अशी शिवशाही व्यापारी संघाच्या वतीने पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शिवाजीराव खडसे यांनी इशारा दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button