
मागासवर्गीय मातंग समाजातील विधवेला भरचौकात मारहाण जवळ्याच्या माजी ग्रामपंचायत सदस्याविरुद्ध तक्रार दाखल या निंदनीय कृत्याचा जाहीर निषेध:- उषामाई कांबळे
पिंपरी , 06/06/25 -प्रतिनीधी, (माझा इंडिया न्यूज) पारनेर येथील मागासवर्गीय मातंग समाजातील विधवा महिलेस मारहाण करणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी, की संबंधित महिला सोमवारी (दि २) ग्रामपंचायतीमध्ये घरकुल योजनेचा फॉर्म भरण्यासाठी जात होती. त्या वेळी एका माजी ग्रामपंचायत सदस्याने घरगुती भांडणाचे कारण काढत भरचौकात तिला मारहाण सुरू केली. या महिलेला त्याने गावातून घरापर्यंत मारहाण करत नेले. तिच्या वयस्कर सासऱ्यांनाही मारहाण केली. महिलेची सासू मदतीसाठी
ओरडत होती. मात्र ‘कुणी मध्ये पडला तर त्याचा मुडदा पाडला जाईल’ अशी धमकी मारहाण करणारा देत असल्याने लोकांनी बघ्याची भूमिका घेतली. एक विद्यमान ग्रामपंचायत सदस्यही या वेळी तेथे होता, असे काही प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.
संबंधित महिलेने पोलिसांत तक्रार दिली असून, पोलिसांनी अजून कोणतीही कारवाई केली नाही.ही अत्यंत गंभीर बाब आहे.
संबंधित आरोपीला तात्काळ अटक करून कार्यवाही करण्यात यावी अन्यथा शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलने राज्यभर करण्यात येथील असा इशारा उपनेत्या उषामाई कांबळे यांनी दिला आहे.