E-PaperTop News

अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गिकरणासाठी महाराष्ट्रात “पोस्ट कार्ड मोहिम” पुन्हा सुरू होणार … युवराज दाखले (हिंदू मातंग सेना)

 

अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गिकरणासाठी महाराष्ट्रात “पोस्ट कार्ड मोहिम” पुन्हा सुरू होणार …
युवराज दाखले (हिंदू मातंग सेना)

मुंबई: 24/06/25 -प्रतिनीधी (माझा इंडिया न्यूज) “पोस्ट कार्ड” मोहीमेच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या व्यक्तींनी केलेलीं उपवर्गिकरणाची मागणी शासन दरबारी पोहचविण्याकरीता महाराष्ट्राच्या ३६ जिल्ह्यातील ३५५ तालूक्यासह ४८ लोकसभा आणि २८८ विधानसभा मतदारसंघातील २७ महानगरपालीकेसह सर्वच नगरपरिषद क्षेत्रातील नागरी वस्तीसह ग्रामीण भागातील ४३,००० गावे २५,००० ग्रामपंचायत क्षेत्रातील प्रत्येक वाड्या-वस्तीत जाऊन *”पोस्ट कार्ड मोहीम” राबविली जाणार आहे. तरी या मोहिमेत सहभागी होणा-या प्रामाणिक,निस्वार्थ कार्यकर्त्यांना समाजातील दानशूर व्यक्ती,व्यवसायिक,उद्योजकांनी सर्वोतोपरी मदत करावी,तसेच अधिकारी-कर्मचारी बांधवानी पोस्ट कार्ड उपलब्ध करून द्यावेत.

समाजातील जागरुक, प्रतिष्ठित व्यक्तींने आपल्या विभागातील एकही व्यक्ती/कुंटूब या पोस्ट कार्ड मोहीमेतून सुटणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच पुरस्कार प्राप्त मान्यवरांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेऊन”पोस्ट कार्ड मोहीम” यशस्वी करावी, हि हिंदू मातंग सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

आपला युवराज दाखले
*हिंदू मातंग सेना*
संपर्क 9922373959

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button