
पुणे पोलीस गुन्हे शाखेची मोठी कामगिरी ! ४८ तोळे सोनं, ५०० ग्रॅम चांदी व मोटारसायकलसह ₹४३.५५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, एक अटकेत
४८ तोळे सोनं, ५०० ग्रॅम चांदी व मोटारसायकलसह ₹४३.५५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, एक अटकेत
मगरपट्टा सिटीमधील फ्लॅटमधून घरफोडी,आरोपीकडून ४८ तोळे सोन्याचे डायमंड दागिने जप्त,१७० सीसीटीव्ही फुटेज तपासून २३ दिवसांचा तपास आरोपी मांजरी येथून अटकेत
पुणे शहरातील हडपसर पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडी प्रकरणाचा तपास करताना गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ व २ यांनी संयुक्तरित्या केलेल्या कारवाईत तब्बल ₹४३.५५ लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. आरोपीकडून ४८ तोळे सोन्याचे डायमंड दागिने, ५०० ग्रॅम चांदी, आणि यामाहा R15 मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
▪️ गुन्हा क्र.: ४७७/२०२५
▪️ गुन्हा दाखल तारीख: १७ ते १८ मे २०२५
▪️ IPC कलम: ३३१(३)(४), ३०५ (अ)
▪️ पोलीस स्टेशन: हडपसर, पुणे
गुन्ह्याच्या तपासादरम्यान, सीसीटीव्ही तपासात आरोपीने वापरलेली यामाहा R15 मोटारसायकल पोलिसांच्या निदर्शनास आली. त्यानंतर सोलापूर, बार्शी, धाराशिव, भुम, परांडा येथे शोध घेण्यात आला.
दाखल गुन्ह्याचा तपास करताना २३ दिवस सलग तपास, १७० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण, आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलीस पथकाने मांजरी येथील गोडबोले वस्तीजवळ सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.
▪️ नाव: रोहित विलास अंधारे
▪️ वय: २५ वर्षे
▪️ व्यवसाय: एक्स-रे टेक्नीशियन
▪️ मूळगाव: भांडगाव, परांडा, धाराशिव
▪️ सध्याचा पत्ता: थिटे वस्ती, खराडी, पुणे
चौकशीत त्याने मगरपट्टा सिटीतील फ्लॅटमध्ये चोरी केली असल्याची कबुली दिली.
💎 जप्त मुद्देमाल :
प्रकार तपशील
सोने ४८ तोळे डायमंड दागिने
चांदी ५०० ग्रॅम
वाहन यामाहा R15 मोटारसायकल
एकूण किंमत ₹४३,५५,०००/-
पोलीस पथकाची प्रशंसनीय कामगिरी : सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री. रंजनकुमार शर्मा मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री. निखील पिंगळे, मा. सहा पोलीस आयुक्त गुन्हे १ श्री. गणेश इंगळे, मा. सहा पोलीस आयुक्त गुन्हे २ श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ चे प्रभारी अधिकारी श्री. नंदकुमार बिडवई, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संदीपान पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण काकुखे, सहा. पोलीस निरीक्षक श्री. सी.बी. बेरड, व पोलीस अंमलदार बाळु गायकवाड, प्रदीप
राठोड, धनंजय ताजणे, अजित शिंदे, गणेश ढगे, इरफान पठाण, रविंद्र लोखंडे, महेश पाटील, साईकुमार कारके, श्रीकांत दगडे, अमित गद्रे, जहांगिर पठाण, विक्रांत सासवडकर, राहुल इंगळे, संदीप येळे, अमोल सरतापे, विनायक येवले, गणेश लोखंडे, मनोज खरपुडे, गणेश गोसावी, दिनकर लोखंडे, राजेश लोखंडे, गणेश खरात, दयानंद तेलंगे, नारायण बनकर, सुरेश जाधव यांनी केली आहे.