
शिवशाही व्यापारी संघ युवक आघाडी पुणे शहर अध्यक्षपदी रोहन संजय भिसे यांची नियुक्ती जाहीर.
मुंबई :21/05/25 :- प्रतिनिधी, (माझा इंडिया न्यूज)शिवशाही व्यापारी संघ युवक आघाडी प्रदेश अध्यक्ष ऋषिकेश वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली व पुणे जिल्हा अध्यक्ष अश्विन खुडे यांच्या सोबतीला पुणे शहर अध्यक्षपदी रोहन संजय भिसे यांची नियुक्ती संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले यांनी शिवशाही व्यापारी संघ मध्यवर्ती कार्यालय मुंबई या ठिकाणाहून जाहीर केली.
नवनियुक्त शिवशाही व्यापारी संघ युवक आघाडी पुणे शहर अध्यक्ष रोहन भिसे यांनी युवकांचे प्रश्न , व्यापारी बांधवांचे, महिला भगिनी,युवती यांचे प्रश्न शासन दरबारी मांडुन ते सोडविण्यासाठी सदैव कटिबध्द राहण्याच्या सूचना दाखले यांनी देऊन पुढील राजकीय व सामाजिक कार्यासाठी शिवशाही व्यापारी संघ उपनेत्या उषामाई कांबळे, मावळ लोकसभा महिला आघाडी अध्यक्षा भारतीताई चांदणं, मुळशी तालुका संगिता ताई जाधव, प्रदेश सचिव सुरज आण्णा कांबळे, प्रदेश उपाध्यक्ष मंगेश डाखोरे यांनी शुभेच्छा दिल्या.