
शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या युवक आघाडी पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्षपदी रोहन माने यांची नियुक्ती जाहीर💐🙏
मुंबई -प्रतिनीधी शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेचे प्रदेश सचिव सुरज आण्णा कांबळे यांच्या सुचनेने व पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष ऋषिकेश वाघमारे यांच्या अनुमोदनाने रोहन माने यांची नियुक्ती संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले यांनी मुंबई मध्यवर्ती कार्यालयातून जाहीर केली.
नवनियुक्त पिंपरी चिंचवड शहर युवक आघाडी उपाध्यक्ष रोहन माने यांनी उपनेत्या उषाताई कांबळे व पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शिवाजीराव खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली माता भगिनी,सर्वसामान्य जनता, व्यापारी वर्ग, दिव्यांग बांधव, तृतीयपंथी भगिनी, यांचे प्रश्न शासन दरबारी मांडून ते सोडविण्यासाठी सदैव कटिबद्ध राहण्याच्या सूचना दाखले यांनी देऊन पुढील राजकीय व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.