
शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या युवक आघाडी पिंपरी चिंचवड शहर सचिवपदी माधव किसन गोंडाळे यांची नियुक्ती जाहीर💐🙏
पिंपरी : 11/05/25: -प्रतिनीधी, (माझा इंडिया न्यूज) शिवशाही व्यापारी संघ प्रदेश सचिव सुरज आण्णा कांबळे व शिवशाही व्यापारी संघ युवक आघाडी पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष ऋषिकेश वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली श्री माधव किसन गोंडाळे यांची नियुक्ती संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले यांनी जाहीर केली.
नवनियुक्त युवक आघाडी पिंपरी चिंचवड शहर सचिव माधव गोंडाळे यांना नियुक्ती पत्रक उपनेत्या उषाताई कांबळे यांच्या शुभहस्ते सा लो डॉ आण्णा भाऊ साठे पूर्णाकृती स्मारक निगडी या ठिकाणी देण्यात आले.
यावेळी शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले, प्रदेश उपाध्यक्ष मंगेश डाखोरे, प्रदेश सचिव सुरज आण्णा कांबळे, युवक आघाडी पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष ऋषिकेश वाघमारे, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शिवाजीराव खडसे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.