
शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या पाठपुराव्या यश.. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बी आर टी बसस्टोप मोरवाडी येथील नामफलकाचे नुतनीकरण.. प्रशासनाचे आभार…
पिंपरी – 30\05\25 , प्रतिनीधी(माझा इंडिया न्यूज) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बी आर टी बसस्टॉप मोरवाडी येथील नामफलकाचे विडंबन झालेले होते. या संदर्भात बी आर टी व्यवस्थापक बापू गायकवाड व इंजिनिअर सुनिल पवार यांच्या निदर्शनास ही गोष्ट आनुन दिली, व प्रशासनाला शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या वतीने इशारा दिला होता.
यासंदर्भात तात्काळ दखल घेऊन बी आर टी विभागाने दखल घेऊन नामफलक दुरूस्ती केल्याने पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने व बापू गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार….
अशाच पध्दतीने आपण कायम सहकार्य कराल हीच अपेक्षा असे मत संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले यांनी व्यक्त केले.