
शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या महिला पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी काजल उत्तम पाटोळे यांची नियुक्ती जाहीर💐
मुंबई 05/05/25. -प्रतिनीधी (माझा इंडिया न्यूज)शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेचे प्रदेश सचिव सुरज आण्णा कांबळे यांच्या सुचनेने व पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश दादा कलवले यांच्या अनुमोदनाने काजल उत्तम पाटोळे यांची नियुक्ती संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले यांनी मुंबई मध्यवर्ती कार्यालयातून जाहीर केली.
नवनियुक्त पुणे जिल्हा उपाध्यक्ष काजल पाटोळे उपनेत्या उषाताई कांबळे व पुणे शहर अध्यक्षा ललीताताई गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली माता भगिनी,सर्वसामान्य जनता, व्यापारी वर्ग, दिव्यांग बांधव, तृतीयपंथी भगिनी, यांचे प्रश्न शासन दरबारी मांडून ते सोडविण्यासाठी सदैव कटिबद्ध राहण्याच्या सूचना दाखले यांनी देऊन पुढील राजकीय व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.