
शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेचा बार्शी तालुका पदाधिकारी संवाद दौरा यशस्वी संपन्न:- सुरज (आण्णा) कांबळे
सोलापूर:- 09/05/2025 ,प्रतिनीधी (माझा इंडिया न्यूज) शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेचा बार्शी तालुका पदाधिकारी संवाद दौरा शुक्रवार दिनांक ९मे २०२५ रोजी संस्थापक अध्यक्ष तथा सकल मातंग समाज प्रदेश समन्वयक लोकसेवक युवराज दाखले यांच्या नेतृत्वाखाली रात्री ११-०० वाजता दौंड तालुक्यातील भांडगाव येथील सा लो डॉ आण्णा भाऊ साठे सभागृहात यशस्वी संपन्न झाला.
या दौऱ्यात सकल मातंग समाज आयोजित २०मे २०२५च्या महाआंदोलनाची माहीती देऊन माहीती पत्रक वाटप करून जास्तीत जास्त समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन दाखले यांनी केले.
दरम्यान दौंड तालुक्यातील भांडगाव येथील सा लो डॉ आण्णा भाऊ साठे सभागृहात समाज उपयोगी वस्तू खरेदी साठी विधानपरिषद आमदार अमित गोरखे सर यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देऊ असा विश्वास दाखले यांनी दिला.
या यशस्वी पदाधिकारी संवाद यात्रेत शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष तथा सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य समन्वयक लोकसेवक युवराज दाखले, प्रदेश सचिव सुरज आण्णा कांबळे, युवक आघाडी पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष ऋषिकेश वाघमारे, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शिवाजीराव खडसे, युवक आघाडी उपाध्यक्ष विक्रम गायकवाड ,मावळ लोकसभा अध्यक्ष कृष्णा साबळे, प्रदेश उपाध्यक्ष मंगेश डाखोरे, मा चेअरमन भांडगाव वि.वि का सोसायटी विजय शेंडगे महाराज, मयुर देवकांबळे, माऊली ससाणे, यश भंडलकर, ओमकार पाटोळे, विकास शेंडगे पत्रकार, अनिल तांबे यांच्या सह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.