
शिवशाही व्यापारी संघ अल्पसंख्याक आघाडी लातुर जिल्हा उपाध्यक्षपदी पटेल वजीर खाजामीया यांची नियुक्ती जाहीर
मुंबई : 03/05/25 :-प्रतिनिधी (माझा इंडिया न्यूज) , शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेचे मराठवाडा विभाग अध्यक्ष विजय वडजे यांच्या सुचनेनुसार प्रदेश सचिव सुरज आण्णा कांबळे व अल्पसंख्यांक आघाडी लातुर जिल्हा अध्यक्ष साबीर पठाण यांच्या नेतृत्वाखाली शिवशाही व्यापारी संघ अल्पसंख्याक आघाडी लातुर जिल्हा उपजिल्हाध्यक्षपदी. *पटेल वजीर खाजामीया* यांची नियुक्ती संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले यांनी मुंबई मध्यवर्ती कार्यालयातून जाहीर केली.
नवनियुक्त लातुर जिल्हा उपाध्यक्ष *पटेल वजीर खाजामीया* यांनी सर्वसामान्य नागरिक, मुस्लिम बांधव, तृतीयपंथी भगिनी, दिव्यांग बांधव,यांचे प्रश्न शासन दरबारी मांडून ते सोडविण्यासाठी सदैव कटिबद्ध राहण्याच्या सूचना दाखले यांनी देऊन पुढील राजकीय व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.