
सायन्स पार्क शेजारील चौकाला आद्यक्रांतीगुरू वस्ताद लहूजी साळवे चौक असं नामकरण :- युवराज दाखले
पिंपरी:- 15/05/25 प्रतिनीधी (माझा इंडिया न्यूज) पिंपरी चिंचवड शहरातील सायन्स पार्क शेजारील चौकाला आद्यक्रांतीगुरू वस्ताद लहूजी साळवे चौक असं नामकरण सकल मातंग समाज व शिवशाही व्यापारी संघ यांच्या माध्यमातून करण्यात आले.
वस्ताद लहूजी साळवे यांचे वास्तव्य काही दिवस चिंचवड परिसरात होते तसेच चाफेकर बंधू, वासुदेव बळवंत फडके यांच्या सारख्या हजारो क्रांतिवीरांचे ते गुरू आहेत.
येणाऱ्या पिढीला वस्ताद लहूजी साळवे यांच नाव कायम स्मरणात राहणार आहे.
हे महान कार्य शिवशाही व्यापारी संघ पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शिवाजीराव खडसे व प्रदेश उपाध्यक्ष मंगेश डाखोरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
या प्रसंगी शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष तथा सकल मातंग समाज प्रदेश समन्वयक लोकसेवक युवराज दाखले, शिवशाही व्यापारी संघ युवक आघाडी प्रदेश अध्यक्ष ऋषिकेश वाघमारे, पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष विक्रम गायकवाड,प्रदेश सचिव सुरज आण्णा कांबळे, वाहतूक आघाडी शहराध्यक्ष अनिल तांबे, अनिकेत भाऊ, शंकर भडकवाड आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.