
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव – 2025
पिंपरी : 28/05/25 प्रतिनिधी (माझा इंडिया न्यूज ) पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव समिती पिंपरी चिंचवड शहर यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक 29 मे 2025 ते शनिवार दिनांक 31 मे 2025 असा तीन दिवसांचा जयंती महोत्सव घेण्यात येणार आहे. या जयंती महोत्सवात गुरुवार दिनांक 29 मे रोजी सकाळी 12 ते 3 या वेळेत “खेळ रंगला पैठणीचा” हा खास महिलांसाठी चा कार्यक्रम आचार्य अत्रे सभागृह संत तुकाराम नगर या ठिकाणी घेण्यात येणार आहे. दुपारी 4 ते 6 या वेळेमध्ये शिवदर्शन सांस्कृतिक शाहिरी संच आयोजित वीस कलाकारांचा यशोगाथा अहिल्यादेवींची हा शाहिरी कार्यक्रम घेण्यात येणार आहे. 29 मे रोजीच सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत पुण्यश्लोक फाउंडेशन निर्मित महानाट्य पुण्यश्लोक हे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित 60 कलाकारांनी सादर केलेले अत्यंत वैभवशाली महानाट्य सादर केले जाणार आहे. हा कार्यक्रम देखील आचार्य अत्रे सभागृह संत तुकाराम नगर या ठिकाणी संपन्न होणार आहे. शुक्रवार दिनांक 30 मे 2025 रोजी सकाळी 12 ते 3 या वेळेत खास महिलांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची वेशभूषा स्पर्धा हा स्पर्धात्मक कार्यक्रम आचार्य अत्रे सभागृह या ठिकाणी घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी महिलांचे तीन प्रकारचे वयोगट तयार करण्यात आले आहेत. वयोगट 5 ते 15 वयोगट 16 ते 30 वयोगट 31 ते 60 याप्रमाणे प्रत्येक वयोगटाला प्रथम क्रमांक 5 हजार रुपये, द्वितीय क्रमांक 3 हजार रुपये, आणि तृतीय क्रमांक 1500 रुपये याप्रमाणे बक्षिसाची रक्कम दिली जाणार आहे. दुपारी 3 ते 5 या वेळेत आचार्य अत्रे संत तुकाराम नगर याच ठिकाणी पारंपारिक महाराष्ट्राचे दर्शन घडविणारा “सुवर्ण महाराष्ट्राचा लोकोत्सव कार्यक्रम” हा कोल्हापूर येथील 40 कलाकारांच्या माध्यमातून सादर केलेला कार्यक्रम होणार आहे. 30 मे 2025 रोजीच सायंकाळी 5 ते 6.30 या वेळेमध्ये प्रसिद्ध होणार आहे