पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रबोधन पर्वाचे उद्घाटन लाखों रुपये खर्चून केले.. परंतु महानगरपालिका लगत असलेल्या स्मारकाकडे दुर्लक्ष स्मारकाला दुध अभिषेक करुन आयुक्त शेखर सिंह व प्रशासनाचा जाहीर निषेध.
पिंपरी, दि. ३० मे २०२५ प्रतिनिधी (माझा इंडिया न्यूज) :- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित तीन दिवसीय विचार प्रबोधन पर्वाचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या हस्ते करण्यात आले.
परंतु पिंपरी चिंचवड महानगरपालिका लगत असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अर्धाकृती स्मारकाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे या निंदनीय कृत्याचा शिवशाही व्यापारी संघ, अखिल भारतीय छावा युवा संघटना व बापू बिरू वाटेगावकर धनगर व मातंग समाज महासंघाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.
राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याचं नियोजन केले आहे, परंतु पिंपरी चिंचवड महानगरपालिका याकडे दुर्लक्ष केले आहे,ही निंदनीय बाब आहे.
जनसंपर्क विभागाला तात्काळ कारणे दाखवा नोटीस आयुक्तांनी द्यावी व कर्तव्यात कसूर केला म्हणून कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अर्धाकृती स्मारकास दुध अभिषेक करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी शिव वाहतूक सेना पुणे जिल्हा अध्यक्ष तथा बापु बिरू वाटेगावकर धनगर समाज महासंघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश भाऊ खरात,शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष लोकसेवक
युवराज दाखले, अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मच्छिंद्र भाऊ चिंचोळे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सचिन अण्णा लिमकर, लहुजी ब्रेगेड संस्थापक अध्यक्ष सतीश दादा भवाळ,माथाडी कामगार नेते आबासाहेब मांढरे,शिवशाही व्यापारी संघ पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश कलवले, उपनेत्या उषामाई कांबळे,
शिवशाही व्यापारी संघ पिंपरी चिंचवड अध्यक्ष शिवाजीराव खडसे, युवक आघाडी प्रदेश अध्यक्ष ऋषिकेश वाघमारे, युवक आघाडी पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष विक्रम गायकवाड,पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष रामभाऊ सूर्यवंशी
अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटना पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संजय भाऊ कांबळे पिंपरी चिंचवड छावा मीडिया अध्यक्ष शुभम बिरादार, रघुनाथ सर मलीशे ज्येष्ठ शिक्षक, शिवशाही व्यापारी संघाचे महादेव गोंडाळे, सुरज सोनकांबळे,आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.