पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने स्मार्ट सिटीच्या अंतर्गत मोरवाडी चौकाकडून आपण चिंचवड स्टेशन कडे जात असताना डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे – लोकसेवक युवराज दाखले
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने स्मार्ट सिटीच्या अंतर्गत मोरवाडी चौकाकडून आपण चिंचवड स्टेशन कडे जात असताना डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे – लोकसेवक युवराज दाखले
पिंपरी चिंचवड : 10/05/2025 : वास्तविक पाहता या डांबरीकरणाचा दर्जा संबंधित ठेकेदाराकडून पाळला जात नाही, सर्वसामान्य जनतेच्या कररूपी पैशातून हे काम करण्यात येत आहे आणि अशा प्रकारचा निष्कृष्ट दर्जाचा डांबरीकरण जर आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अतिरिक्त होत असेल तर ही फार मोठी करोडो रुपयांची उधळपट्टी काढलेली आहे.
लोकसेवक युवराज दाखले शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह साहेबांना विनंती केली की, आपण तात्काळ या संदर्भामध्ये चौकशीचे आदेश देऊन निष्कर्ष दर्जाचा डांबरीकरण हे थांबवावं येणाऱ्या पावसाळ्यामध्ये हे डांबर टिकणार नाही, त्याच्यामुळे पैशाची लाखो रुपयाची करोडो रुपयांची उधळपट्टी ही वाया जाणार आहे.
त्यामुळे संबंधित बीआरटी प्रशासनाचे गायकवाड साहेब असतील व इतर असतील त्यांच्याकडून या संदर्भामध्ये झालेल्या खर्चाची रक्कम आपण वसूल करावेत अशी सर्वसामान्य नागरिकांच्या वतीने व शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या वतीने विनंती संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले यांनी केली आहे.