E-PaperTop News

कर्तव्य बजावत असताना खुन झालेल्या वडगाव पोलीस स्टेशनचे वाहतूक पोलीस हवालदार मिथुन धेंडे यांच्या कुटुंबाला तात्काळ 50लाख रूपये अर्थिक मदत करावी – युवराज दाखले

कर्तव्य बजावत असताना खुन झालेल्या वडगाव पोलीस स्टेशनचे वाहतूक पोलीस हवालदार मिथुन धेंडे यांच्या कुटुंबाला तात्काळ 50लाख रूपये अर्थिक मदत करावी – युवराज दाखले

मावळ : 14/05/2025  – प्रतिनिधी (माझा इंडिया न्यूज)  जुन्या मुंबई पुणे महामार्गावर अतिशय भरघाववेगाने ओवर लोड वाहतूक मोठं मोठे कंन्टनेर करत असतात. यावेळी छोट्या वाहनांना दाबण्याचा प्रयत्न देखील हे ओव्हर लोड वाहतूक करणारे वाहन चालक करित आहेत.

यावेळी अनेक वाहनचालकांना अपघातात जिव गमवावे लागले आहे त्यातच भरघाववेगाने चालवणाऱ्या कंन्टनेरला आडवण्याचा त्यांनी प्रयत्न केल्याने त्यांचा खून करण्यात आला ही अत्यंत गंभीर बाब आहे.

खुन झालेल्या वडगाव पोलीस स्टेशनचे वाहतूक पोलीस हवालदार मिथुन धेंडे यांच्या कुटुंबीयांना 50 लाखांची आर्थिक मदत सरकारने तातडीने करावी व कुटुंबातील एका व्यक्तीला सेवेत सामावून घ्यावे अशी मागणी शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या कडे इमेल द्वारे केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button