E-PaperTop NewsUncategorized
शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या जळगाव जिल्ह्यातील अमलनेर तालुका अध्यक्षपदी श्री प्रशांत रंगराव शिंदे यांची नियुक्ती जाहीर

शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या जळगाव जिल्ह्यातील अमलनेर तालुका अध्यक्षपदी श्री प्रशांत रंगराव शिंदे यांची नियुक्ती जाहीर
मुंबई – 11 एप्रिल, प्रतिनिधी : शिवशाही व्यापारी संघ प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा लोंढे यांच्या नेतृत्वाखाली उपनेत्या सौ उषाताई कांबळे यांच्या सुचनेनुसार अमलनेर तालुका अध्यक्षपदी श्री प्रशांत शिंदे यांची नियुक्ती संस्थापक अध्यक्ष लोकसेवक श्री युवराज दाखले यांनी मुंबई मध्यवर्ती कार्यालयातून जाहीर केली.
नवनियुक्त अमलनेर तालुका अध्यक्ष श्री प्रशांत शिंदे यांनी सर्वसामान्य जनता, व्यापारी वर्ग, दिव्यांग बांधव, तृतीयपंथी भगिनी, यांचे प्रश्न शासन दरबारी मांडून ते सोडविण्यासाठी सदैव कटिबद्ध राहण्याच्या सूचना दाखले यांनी देऊन पुढील राजकीय व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.