
राहटणी -काळेवाडीतील सप्तशृंगी मेडिकल शेजारून जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. तो तात्काळ नागरीकांनसाठी मोकळा करा :- लोकसेवक युवराज दाखले
पिंपरी -प्रतिनीधी पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत असलेल्या ग प्रभागातील प्रभाग क्रमांक २७ मधील सप्तशृंगी मेडिकल शेजारून जाणारा रस्ता शेवटी बंद करून सर्व सामान्य नागरिकांना वेठीस धरण्याचे काम काहींनी चालु केले आहे.
जवळपास चाळीस वर्षांपासून हा रस्ता नागरीकांच्या दळणवळणाकरिता वापरात आहे.यावर पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थापत्य प्रशासनाने करोडो रुपये खर्च केले आहे तरी हा रस्ता लोखंडे खांब लावुन बंद केला आहे. आपण तात्काळ पाच दिवसात हा रस्ता नागरीकांच्या दळणवळणाकरिता खुला न केल्यास तेथील नागरिकांना सोबत घेऊन आंदोलन केले जाईल या कामी उद्भवणाऱ्या सर्व गोष्टींची जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले यांनी दिला आहे.