
महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीमाई फुले यांच्या पूर्णाकृती स्मारकामध्ये सुशोभीकरण व फुलेदापत्य सृष्टी करीत असताना आद्यक्रांतीवीर वस्ताद लहूजी साळवे, ज्ञानज्योती मुक्ता साळवे यांचे प्रसंगचित्रण चित्र उभारा- लोकसेवक श्री युवराज दाखले
- पिंपरी – 02/04/25 , प्रतिनिधी(माझा इंडिया न्यूज), पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने प्रभाग क्रमांक 10मध्ये महात्मा ज्योतिबा फुले व ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या पूर्णाकृती स्मारक व फूले दांपत्य सृष्टी तयार करण्याचे काम संत गतीने सुरू आहे. यांच्या निषेधार्थ निदर्शने आंदोलन भाई विशाल जाधव यांच्या नेतृत्वाखाली जेष्ठ विचारवंत मानव कांबळे माजी नगरसेवक मारुती भापकर व संतोष आण्णा लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड महानगरपालिका शहर अभियंता मकरंद निकम यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवनामध्ये बैठक पार पडली.
या बैठकीत मा नगरसेवक मारुती भापकर, जेष्ठ विचारवंत मानव कांबळे शिवशाही
व्यापारीसंघ संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले व खेड तालुका अध्यक्षा उषाताई कांबळे यांनी जेष्ठ नेते नानासाहेब कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन कर्ते भाई विशाल जाधव व इतर समाज बांधवांच्या निदर्शनास वरील गोष्ठ निदर्शनास आणून दिली.शहर अभियंता मकरंद निकम यांनी तात्काळ आद्यक्रांतीवीर वस्ताद लहूजी साळवे व इतर समइतिहास प्रसंगचित्रण चित्र फुले सृष्टी तयार करित असताना घेण्यात येईल असा शब्द देण्यात आला.
यावेळी मा नगरसेवक संतोष लोंढे, मारुती भापकर, राजेंद्र शिंदे,राजेंद्र शिंदे, विशाल जाधव ,आनंदा कुदळे, वंदना जाधव ,शंकर लोंढे निखिल दळवी, बाळासाहेब रोकडे , उषाताई कांबळे , शिवाजीराव खडसे, आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.