
क्रांतीसुर्य जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाच्या कामाबद्दल होणाऱ्या दिरंगाईसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका शहर अभियंता मकरंद निकम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार..
पिंपरी : 03/04/25 -प्रतिनीधी,(माझा इंडिया न्यूज) क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारकाच्या कामाचे आदेश दिनांक 17 नोव्हेंबर 2021 रोजी झाले मात्र तीन वर्षे उलटून गेलेले असताना देखील हे काम अत्यंत संत गतीने व निकृष्ट दर्जाचे सुरू आहे तसेच या ठिकाणी सुरक्षा रक्षक अभाव त्यामुळे अवैध कामे होतात या सर्व मुद्द्यांवर दिनांक १ एप्रिल 2025 रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन घेण्यात आले होते सदर आंदोलनामध्ये शहरातील विविध संघटना व कार्यकर्त्यांनी दिवसभराचा आंदोलन केले या आंदोलनाची दखल घेऊन आयुक्त शेखर सिंह यांनी शहर अभियंता मकरंद निकम यांना तातडीची बैठक घेण्याचे पिंपरी चिंचवड शहर विशेष अधिकारी किरण गायकवाड यांना सर्व विभागातील अधिकाऱ्यांना व ठेकेदारांना बैठकीचे आदेश निर्गमित केले.
त्यानुसार दोन एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 वाजता शहर अभियंता मकरंद निकम यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या कार्यालयात बैठक संपन्न झाली या बैठकीत स्थापत्य विभाग, विद्युत विभाग, उद्यान विभाग, व संबंधित ठेकेदार , आर्किटेक यांना कार्यकर्त्यांनी धारेवर धरले. माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी सदर स्मारकांमध्ये फातिमाबेन शेख व लहुजी वस्ताद साळवे यांच्या म्युरल बद्दल चौकशी केली असता ते आढळून आल्यामुळे संबंधित ठेकेदार अधिकारी यांना त्वरित कॅमेऱ्याची पूर्तता करण्याची मागणी केली. अधिकारी व ठेकेदार यांना सदर कामांमध्ये काही अडचणी येत असेल तर त्यांनी आम्हा सामाजिक कार्यकर्त्यांना स्पष्ट सांगावा जेणेकरून आम्ही आयुक्तांना यामध्ये जातीन लक्ष घालून स्मारकाचे काम लवकर पूर्ण करण्याची आश्वासित करता येईल असे उद्गार मानव कांबळे यांनी दिलेल्या वेळेत अगर काम पूर्ण झाले नाही तर संबंधित अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासण्यात येईल अशी तीव्र प्रतिक्रिया भाई विशाल जाधव यांनी दिली.अनेक त्रुटी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या त्यानुसार त्यांनी त्यांच्या कामाचा आढावा सर्वांसमोर दिला सदर काम 31 जुलै 2025 अखेर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
त्यानंतर शहर अभियंता मकरंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण स्मारकाची पाहणी करताना मानव कांबळे, मारुती भापकर, आनंदा कुदळे, संतोष अण्णा लोंढे, भाई विशाल जाधव, रोहिणी रासकर, विद्या शिंदे शंकर लोंढे, बाळासाहेब शिंदे, शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले, खेड तालुका अध्यक्षा उषाताई कांबळे , सकल मातंग समाज जेष्ठ नेते नानासाहेब कांबळे निखिल दळवी, प्रदीप पवार, कविताताई खराडे, वंदनाताई जाधव, बाळासाहेब रोकडे असे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
11 एप्रिल 2025 रोजी क्रांतीसुर्य ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त झाकलेले पुतळे उघडून त्या ठिकाणी करून किमान चार दिवस देखरेख करण्याची आदेश त्याठिकाणी शहरा अभियंता मकरंद निकम यांनी दिले.