
शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेची कार्यकारिणी जाहीर.
दिपाली ताई श्रीकांत लोंढे अध्यक्षा :-पिंपरी चिंचवड शहर जिल्हा महिला आघाडी
ललिता ताई दिलीप गायकवाड अध्यक्ष पुणे शहर महिला आघाडी
पुणे : 29 एप्रिल, -प्रतिनीधी (माझा इंडिया न्यूज) शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष मंगेश डाखोरे व सचिव सुरज आण्णा कांबळे यांच्या सुचनेनुसार तसेच उपनेत्या उषाताई कांबळे व कार्यालयीन मुख्य सचिव कल्पना मोरे दाखले यांच्या अनुमोदनाने संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले यांनी मुंबई मध्यवर्ती कार्यालयातून निवड जाहीर केली.
नवनियुक्त पिंपरी चिंचवड शहर महिला आघाडी अध्यक्षा दिपाली ताई लोंढे व पुणे शहर अध्यक्षा ललीताताई गायकवाड यांनी सर्वसामान्य जनता, व्यापारी वर्ग, दिव्यांग बांधव, तृतीयपंथी भगिनी यांचे प्रश्न शासन दरबारी मांडून ते सोडविण्यासाठी सदैव कटिबद्ध राहण्याच्या सूचना दाखले यांनी देऊन पुढील राजकीय व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शिवाजीराव खडसे यांनी दिल्या.