
शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या कलिना विधानसभा कार्याध्यक्षपदी फरहान आरीफ लकडावाला यांची नियुक्ती जाहीर💐🙏
मुंबई – 8 मार्च, प्रतिनिधी(माझा इंडिया न्यूज), शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेचे मुंबई प्रदेश अध्यक्ष योगेश घोरपडे व प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा लोंढे यांच्या नेतृत्वाखाली फरहान आरीफ लकडावाला यांची कलीना विधानसभा कार्याध्यक्षपदी नियुक्ती जेष्ठ नेते नानासाहेब कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले यांनी जाहीर केली.
यावेळी मुंबई प्रदेश अध्यक्ष योगेश घोरपडे,जेष्ठ नेते नानासाहेब कांबळे,मावळ लोकसभा अध्यक्ष कृष्णा दादा साबळे, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शिवाजीराव खडसे, मुंबई प्रदेश उपाध्यक्ष दिलशाद भाई हाशमी, आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान नवनियुक्त कलीना विधानसभा कार्याध्यक्ष फरहान लाकडवाला यांनी सर्वसामान्य जनता, व्यापारी वर्ग, दिव्यांग बांधव, मुस्लिम व्यापारी वर्ग,माता भगिनी यांचे प्रश्न शासन दरबारी मांडून ते सोडविण्यासाठी सदैव कटिबद्ध राहण्याच्या सूचना दाखले यांनी देऊन पुढील राजकीय व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.