
शिवशाही व्यापारी संघ कुलाबा विधानसभा अध्यक्षपदी मुहम्मद इब्रान सिद्दीकी यांची नियुक्ती जाहीर💐🙏
मुंबई :- प्रतिनिधी, शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या मुंबई प्रदेश कुलाबा विधानसभा अध्यक्षपदी मुहम्मद इब्रान सिद्दीकी यांची नियुक्ती संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले यांनी जाहीर केली.
मुंबई प्रदेश अध्यक्ष योगेश घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली मावळ लोकसभा अध्यक्ष कृष्णा साबळे यांच्या सुचनेने ही निवड करण्यात आली.
नवनियुक्त कुलाबा विधानसभा अध्यक्ष इब्रान सिद्दीकी यांनी सर्वसामान्य जनता व्यापारी वर्ग दिव्यांग बांधव तृतीयपंथी भगिनी यांचे प्रश्न शासन दरबारी मांडून ते सोडविण्यासाठी सदैव कटिबद्ध राहण्याच्या सूचना दाखले यांनी देऊन पुढील राजकीय व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.