
शिवशाही व्यापारी संघ खेड तालुका अध्यक्षा उषाताई कांबळे यांच्या पाठपुराव्याला यश “कळमजाईनगर” बस थांबा योग्य ठिकाणी
खेड:-प्रतिनीधी, शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लोकसेवक श्री युवराज दाखले यांच्या नेतृत्वाखाली माळुंगे चाकण रोड वरील बस थांबा योग्य ठिकाणी करण्यात आला.
सर्व सामान्य नागरिकांसाठी बस थांबा कमळजाई नगर याठिकाणी करण्यात आला. बस प्रवासी नागरीकांनी शिवशाही व्यापारी संघ खेड तालुका अध्यक्षा उषाताई कांबळे यांचं कौतुक करुन आभार मांडले जेष्ठ नेते नानासाहेब कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवशाही व्यापारी संघ पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश कलवले, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शिवाजीराव खडसे, महासचिव सुरज आण्णा कांबळे, शिवशाही व्यापारी संघ युवक आघाडी पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष ऋषिकेश वाघमारे, विक्रम गायकवाड,मावळ लोकसभा अध्यक्ष कृष्णा साबळे, प्रदेश उपाध्यक्ष मंगेश डाखोरे, यांच्या सोबतीने हे कार्य करण्यात आले.