
रुग्णाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या डॉक्टर आणि जिल्हा चिकित्स प्रमुख औंध रुग्णालय यांच्यावर निलंबनाची कारवाई होण्याबाबत
पुणे 21 मार्च, प्रतिनिधी ( माझा इंडिया न्यूज) , औंध जिल्हा रुग्णालय येथे पेशंट श्री गिरीश मोरे हा शुगर कमी झाली म्हणून ऍडमिट होता येथील संबंधित डॉक्टर यांनी पेशंट मोरे यांना हा काय आश्रम आहे का असे म्हणून अरेरावीची भाषा वापरून बळजबरीने डिशचार्ज देऊन घरी पाठविले या पेशंटची शुगर कमी होऊन घरी गेल्यावर मृत्यू झाला तरी संबंधित जे डॉक्टर होते त्यांच्यावर त्वरित निलंबनाची कारवाई करण्यात यावी व मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा तसेच औंध रुग्णालय येथे या रुग्णालयातील बरेचसे डॉक्टर नर्स कर्मचारी हे फक्त हजेरी लावून (थंब देऊन) स्वतःचे वैयक्तिक काम करण्यासाठी बाहेर पडतात फक्त ठराविकच स्टाफ हा रुग्णालयात उपस्थित असतो सदर रुग्णालयातील बहुतांश डॉक्टरांचे खाजगी क्लिनिक आहेत त्यामुळे सरकारी रुग्णालयातील औषधांचा वापर हा खाजगी क्लिनिकमध्ये स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी केला जातो येथे असलेल्या कर्मचारी वसाहतीत अनेक कर्मचारी निवृत्तीनंतरही वर्षानुवर्ष येथेच राहतात तसेच बाहेरील गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक येथे राहतात त्यामुळे भांडणे ,खून, बलात्कार यासारखे प्रकार सतत घडत असतात. शेजारी शाळा, कॉलेज असल्याने विद्यार्थिनींची छेडछाड करण्याचे प्रकार देखील घडत आहेत याआधी माननीय जिल्हा चिकित्सक औंध यांना माहितीच्या अधिकारात माहिती मागविली असता समाधानकारक माहिती दिली गेली नाही तरी औंध जिल्हा रुग्णालय येथील प्रमुख आरोग्य अधिकारी व संबंधित डॉक्टर यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर पंधरा दिवसाच्या आत निलंबनाची कारवाई करण्यात यावी यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चिंचवड विधानसभा यांच्या वतीने कोणत्याही प्रकारचे आंदोलन करावे लागेल आणि होणाऱ्या परिणामांची संपूर्ण जबाबदारी संबंधित आरोग्य अधिकारी यांच्यावर राहील असे श्री मोहन बारटक्के शिवदूत ,चिंचवड विधानसभा , शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने कळविण्यात आले आहे
Devendra Fadnavis #eaknathshinde #ajitpawar #aundhhospital #
@devendrafadnavis @eaknathshinde