महापुरुषांचा व मातंग समाजातील साहित्यिकांविषयी अवमान व आक्षेपार्ह विधान करणाऱ्या विकृत मानसिकता असलेल्या प्रबुद्ध साठेचा निषेध: लोकसेवक युवराज दाखले
पिंपरी: 13/03/25 ,-प्रतिनीधी (माझा इंडिया न्यूज), मातंग साहित्य परिषदेच्या वतीने दि.०९/०३/२०२५ रोजी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक चळवळीतील विचारसूत्र’ या विषयावर स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, समरसता गतीविधी यांच्या सहकार्याने निगडी येथे परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.
गेल्या चार दिवसापूर्वी तथाकथित विचारवंत व विकृत मानसिकतेने पछाडलेला प्रबुध्द साठे हा आपल्या युट्युब चॅनलच्या माध्यमातून महापुरूषांच्या व हिंदू मातंग समाजाच्या विरोधात हा बेताल वक्तव्ये करत आहे.याचा जाहिर निषेध शिवशाही व्यापारी संघ व सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्याच्या वतीने करण्यात येत आहे.
मातंग साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या केवळ परिसंवादाच्या पत्रिकाच्या अनुषंगाने प्रबुद्ध साठे हा आपल्या युट्युब चॅनलच्या माध्यमातून महापुरूषांच्या व हिंदू मातंग समाजातील साहित्यिकांच्या विरोधात हा आक्षेपार्ह व बेताल वक्तव्ये करत आहे.तसेच मातंग साहित्य परिषद व मातंग समाजाच्या विरोधात सतत अवमानकारक शब्द वापरुन खालच्या पातळीवर जाऊन सतत ठिका करत असतो.ह्याने स्वत: मातंग समाजाच्या उत्थानासाठी स्वतंत्रपणे कोणतेही कार्य केले नाही.
फक्त युट्युब वर येतो.मातंग समाजावर वादग्रस्त व आक्षेपार्ह विधान करतो.आपल्या युट्युबचे विव्हर वाढवून त्यांतून धंदा करतो.पैसा कमवतो.त्यांची अनेक भाषणे ही मातंग समाजावर बेताल वक्तव्ये करणारी आहेत.
मुळात परिसंवादाच्या पत्रिकेवर स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर डॉ.अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमा एक समान रांगेत का टाकली आहेत. यांमुळे त्याच्या पोटात पाेठसूळ उटले आहे.एक समान पातळीवर महापुरुषांचा सन्मान करणे ह्या विषमतावादी विचारसरणीच्या व विकृत मानसिकतेच्या प्रबुध्द साठेला व त्याला बोलवत्या धन्याला किंवा त्याच्या आखाँला हे रुचले नाही.त्यांमुळे जाती जातीमध्ये विष कालवण्याचे काम तो करत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर,अण्णा भाऊ साठे तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे दलित समाजाच्या उत्थानासाठी महत्त्वपुर्ण कार्य आहे.तसे ऐतिहासिक सुंदर्भ असताना देखील सुपारी घेऊन भाषण करणारा बिनअक्कलेचा प्रबुध्द साठे यांने मुळापासून त्याचा अभ्यास करावा.केवळ युट्युबच्या माध्यमातून वादग्रस्त व आक्षेपार्ह भाषणे अपलोड करुन त्याचे विव्हरस वाढवून पैसा कमवण्यापेक्षा या महापुरुषांचा मुळापासून अभ्यास करणे गरजेचे आहे. महापुरुषांची व मातंग समाजाची बदनामी करण्याचा चालवलेला धंदा प्रबुद्ध साठे याने बंद करावा.
स्वातंत्र्यवीर सावरकर हे स्वातंत्र्य चळवळीतले व सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतले अग्रगण्य नेते होते. सावरकरांचे भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील व सामाजिक परिवर्तनाच्या संघर्षातील योगदान अनन्यसाधारण आहे. जातमानसिकतेतून सावरकरांविषयी आवमानकारक व आक्षेपार्हकारक विधान करणाऱ्यांना शिवशाही व्यापारी संघ व सकल मातंग समाजाच्या वतीने कधीही खपवून घेतले जाणार नाही. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज,क्रांतीगुरु वस्ताद लहुजी साळवे,छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले,लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे हे आम्हाला आदर्श आहेत. तितकेच आदर्श आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकर ,समाजसुधारक गोपाल गणेश आगरकरांनाही मानतो. शिवशाही व्यापारी संघ व सकल मातंग समाज कधीही या महापुरुषांच्या विचारांमध्ये फरक करत नाही.
राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि समरसता गतीविधी यांच्या माध्यमांतून हिंदू मातंग समाजाचे संघटनात्मक बांधनी होत आहे. इंग्रजी व्यवस्थेचा गुलाम झालेल्या प्रबुद्ध साठे याला ते बघवत नाही.चांगल्या अंब्याच्या ढिगाऱ्यातून नासक्या अंब्याला बाजून काढणे हेच योग्य राहते.
आयोजित केलेला हा परिसंवाद हा समाज जोडण्यासाठीचा आहे.त्याचा अभ्यास न करता एखाद्या पिसळालेल्या कुत्र्याप्रमाने सतत भुंकत असणारा प्रबुद्ध साठे यांनी महापुरुषांच्या अवमान प्रकरणी माफी मागावी अन्यथा माफी मागितली नाही तर लवकरच त्याला कायदेशीर परिणामांना सामोरे जावे लागेल असा इशारा शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष तथा सकल मातंग समाज प्रदेश समन्वय लोकसेवक युवराज दाखले यांनी दिला आहे.