
- काळा खडक झोपडपट्टी धारकांना एसआरए प्रकल्पामध्ये अन्याय होऊ देणार नाही- लोकसेवक युवराज दाखले
पिंपरी:- प्रतिनिधी, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या काळाखडक झोपडपट्टी धारकांसाठी एस आर ये अंतर्गत योजना राबवण्याचे काम केतू सोनीगिरा व इतर भागिदारांच्या बिल्डरच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
सर्वसामान्य बहुजन समाजाच्या हितासाठी सुरू होत असलेल्या या एस आरे प्रकल्पाला विरोध नसून त्यांनी तयार केलेल्या आराखड्याला काळा खडक झोपडपट्टी धारकांचा विरोध आहे, त्यांच्या म्हणण्यानुसार अर्ध्या जागेमध्ये ईमारत उभा करून अर्ध्या जागेमध्ये पत्रा शेड तयार करण्यात यावं तेथील रहिवाशी यांना त्या ठिकाणी स्थलांतरित करून इमारत पूर्ण झाल्यानंतर त्यांना पुन्हा त्या ठिकाणी राहण्यास द्यावा अशी त्यांनी जी मागणी आहे त्या मागणीला शिवशाही व्यापारी संघ व सकल मातंग समाजाच्या वतीने जाहीर पाठिंबा जेष्ठ नेते नानासाहेब कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसेवक युवराज दाखले यांनी खेड तालुका अध्यक्षा उषाताई कांबळे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आला.
काळा खडकवासियांचे प्रश्न सुटेपर्यंत आम्ही सोबत राहू अशा प्रकारचं वचन दाखले यांनी देऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह साहेबांनी या संदर्भामध्ये लक्ष घालावं अशी मागणी शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष लोकसेवक श्री युवराज दाखले यांनी केली आहे.