E-PaperTop News

गोल्डन मॅन संतोष भाऊ काची व सामाजिक कार्यकर्ते नितीनजी सोनवणे यांच्या वतीने शिवजयंती रक्तदान, नेत्र तपासणी शिबिर व 395 तुळशीच्या रोपांचे वाटप

गोल्डन मॅन संतोष भाऊ काची व सामाजिक कार्यकर्ते नितीनजी सोनवणे यांच्या वतीने शिवजयंती रक्तदान, नेत्र तपासणी शिबिर व 395 तुळशीच्या रोपांचे वाटप

पिंपरी चिंचवड , प्रतिनिधी (माझा इंडिया न्यूज) १९ फेब्रुवारी २०२५ श्री. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९५ व्या शिवजयंती निमित्त जुनी सांगवी येथे आर.पि.आय.(आठवले) मातंग आघाडी गटाचे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य गोल्डन मॅन मा. संतोष भाऊ काची व सामाजिक कार्यकर्ते मा नितीन भाऊ सोनवणे यांनी सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून भव्य रक्तदान शिबीर व नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले व ३९५ तुलसी चे रोपे वाटप करण्यात आले, कार्यक्रमाला आर.पि.आय (आठवले) मातंग आघाडी चे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष मा. आण्णासाहेब वायदंडे तसेच उद्योजक शंकर भाऊ भोरडे, माजी नगरसेवक अतुल भाऊ शितोळे, राहूल दादा कलाटे व वनमित्र मा. अरुण शेठ पवार व लवकेश काची यांनी हजेरी लावली व तसेच कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते गोल्डमन बंधू मा. आकाश भाऊ मल्लाव व निशीकांत मल्लाव, अन्य मान्यवर प्रदीप भाऊ कांबळे(पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष) आरतीताई ढावरे पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष)बाळासाहेब जोगदंड(पुणे जिल्हाध्यक्ष) दत्तात्रेय चव्हाण(संघटक सचिव), कैलास पाटोळे(पुणे शहराध्यक्ष), नेहाताई पवार(पुणे शहर महिला अध्यक्ष)बाबासाहेब पाटोळे, सुनिल जाधव, तुकाराम क्षिरसागर, तसेच मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज दिग्दर्शक सुधीर भालेराव व सहकारी कलाकार ह्यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली, कार्यक्रमाचे नियोजन सौ संगीता ताई संतोष काशी, चिरंजीव यश काची,सौ. पुनमताई जाधव(पिंपरी चिंचवड महिला अध्यक्ष) धिरजभाऊ सकट(पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष) कु. रतिका शर्मा, जावेद शेख, हिरामण जाधव  क्रांतिवीर विचार मंचाचे अविनाश भाऊ शिंदे राजुशेठ आवळे, शंकर भाऊ खवळे ज्योतीताई शिंदे , बाबासाहेब पाटोळे व सहकारी यांनी केली होती, शिबीराला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला नागरिकांनी तुळसीचे रोपेवाटपाबद्ल आनंद व्यक्त केला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button