स्वातंत्र्याचे शिल्पकार, आद्यक्रांतीगुरु वस्ताद लहूजी साळवे व क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांची पुण्यतिथी क्रांतिवीर विचार मंच व तसेच पिंपरी चिंचवड आद्य क्रांतिवीर लहुजी साळवे स्मारक चिंचवड व पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये संपन्न ..!
पिंपरी चिंचवड , दिनांक १७ फेब्रुवारी : (माझा इंडिया न्यूज) स्वातंत्र्याचे शिल्पकार, सशस्त्र क्रांतीचे जनक, थोर समाजसेवक, राघोजी नंदन लाखो क्रांतिकारकांचे गुरुवर्य आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अध्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे व वासुदेव बळवंत फडके यांच्या अर्धाकृती स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रशासकीय इमारतीमध्ये उपायुक्त चंद्रकांत इंदलकर साहेब व उपायुक्त अण्णासाहेब बोदडे यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी जनसंपर्क मुख्य अधिकारी किरण गायकवाड व प्रफुल पुराणिक साहेब ,मा नगरसेवक मारुती भापकर, संदीपान झोंबाडे, आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्व अध्यक्ष बाबासाहेब तात्याराम पाटोळे, साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पूर्वचे अध्यक्ष -: नितीन जी गुलाबराव घोलप व त्याचबरोबर पिंपरी चिंचवड मधील सर्व क्रांतिवीर विचार मंचाचे पदाधिकारी अविनाश शिंदे,राजू आवळे,शंकर खवळे,ज्योतीताई शिंदे,लहू आडसूळ,आनंद कांबळे, भारतीताई अवघडे,अविनाश गायकवाड, संतोष आवळे, सुशांत ठाकूर, सुनीलजी खुडे, मधुकर काळे, शिवराज गायकवाड, संजय भंडारी, महेश अवघडे आदी पदाधिकारी उपस्थितीत होते.व त्याचबरोबर पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासकीय इमारतीमध्ये अविनाश गायकवाड यांनी लव वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात केली. व त्याचबरोबर उपस्थित अण्णासाहेब कसबे धनंजय भिसे, नानासाहेब कांबळे, युवराज दाखले, गणेश कलवले, मंगेश डाखोरे, शिवाजी खडसे, आदी प्रमुख पदाधिकारी होते.