सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य समन्वयकांची चिंतन बैठक पुण्यात पार पडली.

सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य समन्वयकांची चिंतन बैठक पुण्यात पार पडली.
पुणे -: प्रतिनिधी, (माझा इंडिया न्यूज)
मातंग समाजाच्या शैक्षणिक व आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने तसेच आर्टी व अनुसूचित जमातीचे उपवर्गीकरण करण्या संदर्भात पुढील कृती कार्यक्रम ठरवण्यासाठी चिंतन बैठक हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कलादालन स्वारगेट या ठिकाणी पार पडली या बैठकीचे नियोजन सकल मातंग समाजाचे पंचायत समन्वयक अनिल दादा हातागळे, भास्कर नेटके, अशोक लोखंडे यांनी केले होते यावेळी माजी गृहराज्यमंत्री रमेश दादा बागवे, विधानपरिषद आमदार अमितजी गोरखे, झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष भगवानराव वैराट , जेष्ठ मार्गदर्शक भगवान वैरागकर,शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष तथा सकल मातंग समाज प्रदेश समन्वयक लोकसेवक युवराज दाखले तसेच विविध सामाजिक संघटनेमध्ये काम करणारे प्रमुख पदाधिकारी राज्यभरातून समन्वयक पदाची जबाबदारी सांभाळून काम करत असणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान यावेळी गाव तिथे सकल मातंग समाजाचा समन्वयक व नामफलक असा संकल्प करण्यात आला.व सकल मातंग समाज पिंपरी चिंचवड शहर समन्वयकपदाची जबाबदारी १) जेष्ठ नेते नानासाहेब कांबळे २)गणेश कलवले ३) शिवाजीराव खडसे ४) मंगेश डाखोरे,५)अमोल लोंढे यांना देण्यात आली अशी माहिती सकल मातंग समाज प्रदेश समन्वयक लोकसेवक युवराज दाखले यांनी दिली.
नवनियुक्त सकल मातंग समाज समन्वयकांनी मातंग समाजाच्या समाज बांधवांनच्या शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याची सुचना व विनंती दाखले यांनी करून पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.