
शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या पुणे शहर महिला आघाडी अध्यक्षापदी सौ.भारती दिगंबर थोरात यांची नियुक्ती जाहीर.
पुणे :- 14/02/25, प्रतिनीधी, (माझा इंडिया न्यूज) शिवशाही व्यापारी संघ महीला आघाडी मुख्य सचिव कल्पना मोरे दाखले यांच्या सुचनेने पुणे जिल्ह्या अध्यक्ष गणेश कलवले यांच्या सोबतीला पुणे शहर अध्यक्षा पदी भारती दिगंबर थोरात यांची नियुक्ती संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले यांनी जाहीर केली.
नवनियुक्त शिवशाही व्यापारी संघ महीला आघाडी पुणे शहर अध्यक्षा भारतीताई थोरात यांनी सर्व सामान्य नागरीक,माता भगिनी,दिव्यांग बांधव व तृतीयपंथी भगिनी यांचे प्रश्न शासनदरबारी मांडुन ते सोडवण्यासाठी सदैव कटिबध्द राहण्याची विनंती व सुचेना दाखले यांनी देऊन पुढील राजकीय व सामाजीक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.