शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अल्पसंख्यांक आघाडी प्रदेश अध्यक्षपदी इसा अबुबकर शेखान यांची नियुक्ती
मुंबई : १८ फेब्रुवारी, -प्रतिनीधी, (माझा इंडिया न्यूज) शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष धनंजय ढावरे यांच्या नेतृत्वाखाली *इसा अबुबकर शेखान* यांची शिवशाही व्यापारी संघ अल्पसंख्यांक आघाडी प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती मुंबई मध्यवर्ती कार्यालया मधुन संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले यांनी जाहीर केली.
नवनियुक्त शिवशाही व्यापारी संघ अल्पसंख्यांक आघाडी प्रदेशाध्यक्ष शेख खान यांनी सर्वसामान्य नागरिक व्यापारी वर्ग ,मुस्लिम बांधव माता भगिनी दिव्यांग बांधव , तृतीयपंथी भगिनी यांचे प्रश्न शासन दरबारी मांडून सोडविण्यासाठी सदैव कटिबद्ध राहण्याच्या सूचना विनंती दाखले यांनी करून पुढील राजकीय व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.