
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा भक्ती शक्ती समूह शेजारील पूर्वीचा अर्धाकृती पुतळा अंधाऱ्या कोठडीतून उजेडाकडे नेऊन तो यमुनानगर येथील सांस्कृतिक भवनामध्ये उभा करा:- शिवाजीराव खडसे
पिंपरी :-प्रतिनीधी, (माझा इंडिया न्यूज) 05/02/25
सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य व शिवशाही व्यापारी संघाच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे विनंतीपूर्वक मागणी करण्यात आली आहे की,
जवळपास गेल्या पंधरा वर्षापासून साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांचा अर्धाकृती पुतळा आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून अंधार्या कोठडीत ठेवण्यात आलेला आहे.
साहेब ही अतिशय चिंताजनक आणि निंदनीय बाब आहे, आम्ही शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेचे पदाधिकारी तसेच सकल मातंग समाजातील समाज बांधव आपणास विनंती करत आहे की, साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांचा अर्धाकृती पुतळा हा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्पर्धा परीक्षा केंद्र सांस्कृतिक भवन यमुना नगर निगडी या ठिकाणी उभा करून त्याचा उचित सन्मान करण्यात यावा अशी मागणी शिवशाही व्यापारी संघ व सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्याच्या वतीने मागणी करण्यात आली आहे.
अन्यथा आम्हाला सकल मातंग समाज त्याचबरोबर अखंड बारा बलुतेदार समाज बांधवांना सोबत घेऊन आंदोलने करावे लागतील या कामी उद्भवणाऱ्या सर्व गोष्टींची जबाबदारी आपली व आपल्या प्रशासनाचे राहील असा समाज हिताचा इशारा जेष्ठ नेते नानासाहेब कांबळे,लोकसेवक युवराज दाखले, शिवाजीराव खडसे, विक्रम गायकवाड, गणेश कलवले, मंगेश डाखोरे, अमोल लोंढे, सुरज आण्णा कांबळे, आदी प्रमुख पदाधिकारी यांनी दिला आहे.
धन्यवाद…