E-PaperTop News

जगभरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्सवात साजरी ..!!

माझा इंडिया न्यूज: दि.19/2/2025 वार बुधवार

जगभरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्सवात साजरी ..!!

पिंपरी चिंचवड : शिवजयंती निमित्त महाराष्ट्र विधान परिषदेच्या आमदार सौ.उमाताई खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज निगडी येथील श्री खंडोबा मंदिरातून भव्य अशी रॅली काढण्यात आली.
या वेळी आमदार सौ.उमाताई खापरे, आमदार शंकरशेठ जगताप,आमदार अमित गोरखे,प्राधिकरणा चे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे,माजी उपमहापौर शैलजाताई मोरे, नगरसेवक गोविंद घोळवे,मा.नगरसेवक राजू दुर्गे,बांधकाम व्यावसायिक जयदिप खापरे ,श्री खंडोबा देवस्थान चे अध्यक्ष तानाजी काळभोर व सौ.मंगल तानाजी काळभोर तसेच उपाध्यक्ष सोमनाथ काळभोर,कार्याध्यक्ष शंकर आप्पा काळभोर,सचिव भाऊसाहेब काळभोर, भाजप उपाध्यक्ष राजेंद्र बाबर,सुशांत मोहिते,सतिश कुटे,संतोष मुळीक व मार्तंड रेवी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या मुर्ती समोर प्रथम महाआरती करण्यात आली.या नंतर शिवभक्त ह.भ.प.संस्कृती सुधीर ढगे (पाटील) हिने महाराजाच्या मूर्ती समोर मानवंदना दिली.यानंतर सर्व उपस्थित शिवभक्तांनी छत्रपती शिवाजीमहाराज कि जय,धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज कि जय,जिजाऊ आई साहेब कि जय असा जयघोष करत श्री खंडोबा मंदिरातील परिसर दणाणून सोडला.या वेळी देवस्थान च्या वतीने सर्व मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
यानंतर हि भव्य रॅली श्री खंडोबा मंदिरातून चाफेकर चौक,चिंचवड कडे मार्गस्थ झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button