
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत हा मोदींच्या विकासाचा विजय असुन केजरीवालांच्या भ्रष्टाचारांची हार आहे – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
मुंबई दि.8 – (माझा इंडिया न्यूज) दिल्ली विधानसभा निवडणुकित भाजपला प्रचंड बहुमतांने विजय मिळालेला आहे.भाजपचा हा विजय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या विकासाचा विजय असुन अरविंद केजरिवाल यांच्या भ्रष्टाचाराची हार आहे. अशी प्रतिक्रीया रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी व्यक्त केली.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला दिलेल्या बहुमताबद्दल दिल्लीतील जनतेचे आभार मानत या निवडणुक निकालाचे ना.रामदास आठवले यांनी स्वागत केले आहे.महाराष्ट्र,हरियाणा आणि आता दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल हा दलितांनी भाजप प्रणित एन डी ए ला बहुमतांचा कौल दिला असल्याची ग्वाही देत आहे असा दावा ना.रामदास आठवले यांनी केला आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाचा विकास वेगाने होत आहे.रस्ते,रेल्वे,विमानतळ आंतरराष्टीय दर्जाची बांधली जात आहेत.सर्वच क्षेत्रात देशाचा विकास होत आहे.त्यामुळे विकासाची दुरदृष्टी असणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर जनतेचा अतुट विश्वास आहे.महाराष्ट्र,हरियाणा आणि आता दिल्लीतिल जनतेने विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत देऊन मोदींवरील विश्वासावर शिक्कामोर्तब केलेले आहे असे ना.रामदास आठवले म्हणाले.
आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी भ्रष्टाचारा विरुध्द आंदोलन पुकारुन नवे नेतृत्व म्हणुन ते पुढे आले.भ्रष्टाचाराविरुध्द उभे राहिलेले केजरीवाल झपाट्याने भ्रष्टाचारात गुरफटत जाऊन भ्रष्टाचारी झाले.दिल्लीतील जनतेला केजरीवाल न्याय देऊ शकले नाही.दिल्लीतील जनतेला पिण्याचे शुध्द पाणी सुध्दा ते देऊ शकले नाही.खराबपाणी दिले तसे आप सरकारचे कामकाज ही खराब ठरले.त्यामुळे दिल्लीतील जनतेने अरविंद केजरीवाल यांना पराभवाचे पाणी पाजले आहे असा टोला ना.रामदास आठवले यांनी लगावला आहे.