
बहुजन समाजाच्या अखंडीत संघर्षामुळे त्यागमूर्ती माता रमाईच्या स्मारकाच उभारण्याचा मार्ग मोकळा. – लोकसेवक श्री. युवराज दाखले
पिंपरी:- 05/02/25 , प्रतिनीधी, (माझा इंडिया न्यूज) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती स्मारकाच्या पाठीमागील जागा त्यागमती माता रमाईंच्या स्मारकासाठी मिळण्यासाठी बहुजन समाजातील विविध कार्यकर्त्यांनी संघर्ष आंदोलने केलेली होती परंतु महानगरपालिका प्रशासन व पी एम पी एल प्रशासन या दोघांच्या अभाव समन्वयामुळे मार्ग निघत नव्हता.
परंतु बहुजन समाजाच्या पदाधिकार्यांच्या प्रामुख्याने धुराजी शिंदे, व रामभाऊ ठोके यांच्या वेळोवेळी घेतलेल्या निदर्शने अंदोलन, आमरण उपोषणामुळे,तसेच वंचित बहुजन अघाडीच्या माध्यमातुन सचिव अंदोलनकर्ते राजेंद्र साळवे,संतोष जोगदंड व दिपक भालेराव यांच्या अखंडीत आंदोलनामुळे तसेच यांच्या आंदोलनाला वेळोवेळी सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य व शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या वतीने पाठिंबा व साथ जेष्ठ नेते नानासाहेब कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आलेली होती.
सध्या चालु असलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या निदर्शने आंदोलनास शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शिवाजीराव खडसे यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड महानगरपालिका व पीएमपीएल प्रशासनाला रक्त लिखित पत्रव्यवहार करणार असल्याचा इशारा संस्थापक /अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले यांनी दिलेला होता.
या रक्त लिखीत पत्रव्यवहार इशाराची तात्काळ गंभीर दखल घेऊन आयुक्त शेखर सिंह साहेब व पीएमपीएल प्रशासन यांनी एकत्र येऊन माता रमाई यांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी करून पीएमपीएल प्रशासनाने या जागेचा आम्हाला उपयोग नसल्याने आम्ही ही जागा महापालिकेकडे देत आहोत अशा प्रकारचा सकारात्मक दृष्टिकोनातून पत्र दिलेलं आहे.
यामुळे मातारमाईंच्या स्मारकाचा मार्ग मोकळा झालेला आहे. या संदर्भात बुधवार दिनांक 5 -2 -2025 रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या ठिकाणी व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या गेट वरती आंदोलन करते रामभाऊ ठोके यांनी पुकारलेल्या आमरण उपोषणाच्या ठिकाणी पीएमपीएल प्रशासनाने दिलेल्या लेखी समाधानाकार उत्तरामुळे आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
आंदोलनकर्ते धुराजी शिंदे व रामभाऊ ठोके यांनी सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य व शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेचे पाठिंबा व साथ दिल्याने जेष्ठ नेते नानासाहेब कांबळे व लोकसेवक युवराज दाखले यांचे आभार मांडुन अभिनंदन केले.
यावेळी शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष तथा सकल मातंग समाज समन्वयक लोकसेवक युवराज दाखले,जेष्ठ नेते नानासाहेब कांबळे, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शिवाजीराव खडसे, महासचिव सुरज आण्णा कांबळे,पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश कलवले, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मंगेश डाखोरे, रिलस्टार लहुसैनिक तथा शिवशाही व्यापारी संघ युवक आघाडी पिं चि शहर अध्यक्ष ऋषिकेश वाघमारे, उपाध्यक्ष विक्रम गायकवाड, शिवाजी माने, शिवशाही व्यापारी संघ वाहतूक आघाडी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अनिल तांबे, भोसरी विधानसभा अध्यक्ष मारुती काळे, आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.