
भोसरी -लोढेवाडी येथील सा.लो आण्णा भाऊ साठे उद्यान चोरी गेल्याने गुन्हा दाखल करा- लोकसेवक युवराज दाखले
पिंपरी -प्रतिनीधी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत गेल्या अनेक वर्षीपासून भोसरी लांडेवाडी येथील सा लो आण्णा भाऊ साठे उद्यान हे. चोरीला गेल्याचे दिसुन येत आहे.
त्यासंदर्भात सर्व वृत्तपत्रकांनी दखल घेतली आहे
साहेब ही अत्यंत गंभीर बाब आहे तरी आपण आपल्या सुरक्षा विभागामार्फत सदरील उद्यान चोरी गेल्या संदर्भात गुन्हा दाखल करावा अशी सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य व शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त एक प्रदिप जांबळे पाटील व उद्यान उपायुक्त ढाकणे साहेब यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
या निवेदनावर शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले, प्रदेश उपाध्यक्ष मंगेश डाखोरे, आलेप्रवक्त्या रोहीनी ताई खडसे,शहराध्यक्ष शिवाजीराव खडसे, शिवशाही युवक आघाडी उपाध्यक्ष विक्रम गायकवाड,खेड तालुका अध्यक्षा उषाताई कांबळे, पुणे शहर अध्यक्षा ललीताताई गायकवाड ,सुजन कांबळे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.