E-PaperTop News

रिवा फाऊंडेशनचा उद्योजक व उद्योजीका पुरस्कार सोहळा व महिला फॅशन शो स्पर्धा रंगणार २० फेब्रुवारीस

रिवा फाऊंडेशनचा उद्योजक व उद्योजीका पुरस्कार सोहळा व महिला फॅशन शो स्पर्धा रंगणार २० फेब्रुवारीस

उदयोजकांना शाबासकी देण्यास चिंचवड चे आमदार शंकर जगताप राहणार उपस्थितीत

चिंचवड: 17/02/25 : उद्योग आणि उद्योजक यांना प्रेरणा देणारा,यशस्वितांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारून नव उद्योजकांना दिशा देणारा, रिवा फाऊंडेशन चा ” रिवा उत्कृष्ट उद्योजक – उद्योजिका पुरस्कार ” प्रदान सोहळा गुरुवार, दिनांक २० फेब्रुवारी २०२५ रोजी चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात सायंकाळी ४ वाजता मोठ्या दिमाखात संपन्न होणार आहे.
आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते व माजी महापौर अपर्णा डोके आणि इनफ्लक्स ग्रुप ऑफ कंपनीचे डायरेक्टर शिवाजी चमकीरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण होणार असून, यावेळी उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेल्या उद्योजक व उद्योजिकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यासाठी उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती फाऊंडेशनच्या अध्यक्षा वर्षा सोनार यांनी दिली.
याचवेळी “रिवा मिसेस महाराष्ट्र ” फॅशन स्पर्धा होणार असून, या रंगारंग फॅशन शो मध्ये फॅशन विश्वातील नामवंत स्पर्धक सहभागी होणार आहेत. विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. या स्पर्धेसाठी प्रसिद्ध कोरिओग्राफर व मिसेस युनिव्हर्स सविता एस.के. यांच्याकडून कोरिओग्राफीचे सेशन्स स्पर्धकांसाठी घेण्यात येणार आहेत.
याशिवाय प्रेक्षागृहात उपस्थित प्रेक्षकांमधून लकी ड्रॉ काढण्यात येणार असून त्यातील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत.
रिवा फाऊंडेशनच्या वंदना कोल्हापूरे, साधना दातीर, हेमा गाडे, अश्विनी पटेल, अ‍ॅड. विठ्ठल सोनार, अशोक बोराडे, प्रितम शहा व इतर सदस्य यावेळी उपस्थित राहून येणाऱ्या प्रेक्षकांचे स्वागत करणार..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button