
अत्याधुनिक युगातील “फकीरा” श्री.मारुती जाधव यांचा सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य व शिवशाही व्यापारी संघाच्या वतीने सन्मान ..!! 💐💐
पिंपरी :- 07/02/25 ,प्रतिनिधी, (माझा इंडिया न्यूज)
माता-भगिनींच्या संरक्षणार्थ शहरातील युवकांनी फकीरा प्रमाण वागलं पाहिजे जगलं पाहिजे समाजातील कोणत्याही माता भगिनी वरती अन्याय करण्यात आला तर फकीरा प्रमाण त्यांच्या विचाराचा वारसा कायम तेवत ठेवण्यासाठी युवकांनी अग्रेसर राहील पाहिजे असं प्रतिपादन ज्येष्ठ नेते नानासाहेब कांबळे यांनी व्यक्त केला.
सामाजिक कार्यकर्ते मारुती जाधव यांनी महिलांच्या संरक्षणार्थ जी ठोस भूमिका घेतली त्या भूमिकेचे स्वागत लोकसेवक युवराज दाखले यांनी करून त्यांचा श्रीफळ,हार व सा लो डॉ आण्णा भाऊ साठे लिखित फकिरा कांदबरी देऊन उचित सन्मान करण्यात आला.
यावेळी शिवशाही व्यापारी संघटनेचे शहराध्यक्ष शिवाजीराव खडसे, पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश कलवले,कार्याध्यक्ष अमोल लोंढे, प्रदेश उपाध्यक्ष मंगेश डाखोरे, महासचिव सूरज आण्णा कांबळे, आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.